Posts

Showing posts from October, 2017

प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग - २    ( Shantiniketan Days ) अखेर तो क्षण आज आलाच. माझ्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बहुतांश लोकांना, मित्रांना मी हे लिहू शकतो हे मात्र पटलं नाही. त्यांना माझी दूसरी बाजू बघून नक्कीच समाधान झाले असेल, पण मला मात्र यात आश्चर्यासारखं काहीच वाटलं नाही. चला तर मग सुरुवात करूयात. १०चे ते भयाण वर्ष असं 'टाईमपास' चित्रपटातल्या  संभाषाणांप्रमाणे थोडं भीत-भीतचं मी त्या रममाण विश्वात उडी टाकली. १०वीला मी शांतिनिकेतन,सांगली इथे होतो. १०वीचा बऱ्यापैकी अभ्यासक्रम हा ९वीत असतानाच शिकवून पूर्ण झाला होता. १०वीचा संपूर्ण वर्ष आता फक्त तेच ६ पुस्तके वाचायला लागणार होते. इथेच खरं तर माझा खुप हिरेमोड झाला होता. लहानपणीपासून वाचण्याची प्रचंड आवड. काय करावं हे सूचत न्हवत. सकाळी ६ ते ८, ९ ते दुपार १, परत २ ते ५ व ७ ते ९ फक्त अभ्यास एके अभ्यास. एकच विषयाचा  अभ्यास १० दिवस करावे लागे व शेवटच्या दिवशी केलेल्या अभ्यासावर परीक्षा ( अभ्यास कुठले ओ नुसता दंगा, टवाळकी ). असं करत १०वीच्या वर्षातले ६ महिने कसेबसे संपले. कुठे तर आपलं चुकतंय हे कळत होता प

प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग-१ कसं सुरुवात करावं हेच कळत न्हवतं म्हणून बरीच वर्ष मी लिहिण्यासाठी टाळाटाळ करत होतो. आपल्या लेखणीला दाद मिळेल की नाही ह्या प्रश्नावरच अडकुन राहिलो होतो. मनामध्ये खुप प्रबळ इच्छा होती पण नियती काय साथ देत न्हवती. अखेर तो क्षण आज आलाच.  आता मी नेमकं लिहणार काय आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो. प्रत्येक पदवी धारकाला १०वी ते १२वी ह्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या काटेरी मार्गावरुन प्रवास करावाच लागतो. ह्या टप्प्यातून जो कोणी पार पडेल त्याचा आयुष्याचा प्रवास सुखकर होईल असं म्हणालं तर वावगं ठरणार नाही. बालिश बुद्धी ते Maturity चा मधला काळ म्हणजे १०वी-१२वीचा काळ. ह्या वयात कळत पण नाही आणि वळत पण नाही. खरं अभ्यास करण्याचं हीच ती वेळ असते पण आपण इथेच तर चुकतो. १०वीची परीक्षा दिली की आपल्याला असं वाटतं की आपण खुप काही मिळवलं पण हीच तर आपली मोठी चूक ठरते. इथूनच आपल्या आयुष्याची दिशा बदलते हे मात्र आपण विसरतो. १०वीचे ते फुगीर गुणच आपलं घात करतात. आपल्या त्या फुगीर गुणांवर आपल्या बरोबरच आपल्या पालकांचा सुद्धा एवढा विश्वास बसतो की जणू माझं पोरचं भविष्यात 'आदर्श विद्यार्थी' हा किताबच मिळव