प्रवास - ९०% ते ५०% चा
भाग - २ ( Shantiniketan Days ) अखेर तो क्षण आज आलाच. माझ्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बहुतांश लोकांना, मित्रांना मी हे लिहू शकतो हे मात्र पटलं नाही. त्यांना माझी दूसरी बाजू बघून नक्कीच समाधान झाले असेल, पण मला मात्र यात आश्चर्यासारखं काहीच वाटलं नाही. चला तर मग सुरुवात करूयात. १०चे ते भयाण वर्ष असं 'टाईमपास' चित्रपटातल्या संभाषाणांप्रमाणे थोडं भीत-भीतचं मी त्या रममाण विश्वात उडी टाकली. १०वीला मी शांतिनिकेतन,सांगली इथे होतो. १०वीचा बऱ्यापैकी अभ्यासक्रम हा ९वीत असतानाच शिकवून पूर्ण झाला होता. १०वीचा संपूर्ण वर्ष आता फक्त तेच ६ पुस्तके वाचायला लागणार होते. इथेच खरं तर माझा खुप हिरेमोड झाला होता. लहानपणीपासून वाचण्याची प्रचंड आवड. काय करावं हे सूचत न्हवत. सकाळी ६ ते ८, ९ ते दुपार १, परत २ ते ५ व ७ ते ९ फक्त अभ्यास एके अभ्यास. एकच विषयाचा अभ्यास १० दिवस करावे लागे व शेवटच्या दिवशी केलेल्या अभ्यासावर परीक्षा ( अभ्यास कुठले ओ नुसता दंगा, टवाळकी ). असं करत १०वीच्या वर्षातले ६ महिने कसेबसे संपले. कुठे तर आपलं चुकतंय हे...