प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग - २   ( Shantiniketan Days )


अखेर तो क्षण आज आलाच. माझ्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बहुतांश लोकांना, मित्रांना मी हे लिहू शकतो हे मात्र पटलं नाही. त्यांना माझी दूसरी बाजू बघून नक्कीच समाधान झाले असेल, पण मला मात्र यात आश्चर्यासारखं काहीच वाटलं नाही.
चला तर मग सुरुवात करूयात.

१०चे ते भयाण वर्ष असं 'टाईमपास' चित्रपटातल्या संभाषाणांप्रमाणे थोडं भीत-भीतचं मी त्या रममाण विश्वात उडी टाकली. १०वीला मी शांतिनिकेतन,सांगली इथे होतो. १०वीचा बऱ्यापैकी अभ्यासक्रम हा ९वीत असतानाच शिकवून पूर्ण झाला होता. १०वीचा संपूर्ण वर्ष आता फक्त तेच ६ पुस्तके वाचायला लागणार होते. इथेच खरं तर माझा खुप हिरेमोड झाला होता. लहानपणीपासून वाचण्याची प्रचंड आवड. काय करावं हे सूचत न्हवत. सकाळी ६ ते ८, ९ ते दुपार १, परत २ ते ५ व ७ ते ९ फक्त अभ्यास एके अभ्यास. एकच विषयाचा  अभ्यास १० दिवस करावे लागे व शेवटच्या दिवशी केलेल्या अभ्यासावर परीक्षा ( अभ्यास कुठले ओ नुसता दंगा, टवाळकी ).

असं करत १०वीच्या वर्षातले ६ महिने कसेबसे संपले. कुठे तर आपलं चुकतंय हे कळत होता पण कुठे चुकतंय हे मात्र कळत न्हवतं. दिवाळीची सुट्टी संपली मी सुद्धा तुपातल्या लाडू प्रमाणे गोल-गोल होऊन परत एकदा अभ्यास चालू केलं ( स्वतःहुन थोडीच चालू केलं, जबरदस्तीने करावं लागलं ). ह्यावेळी मात्र मी वाचनालायाकडे वळायला लागलो. दुपारच्या १ तासाच्या जेवणाच्या सुट्टीत मी मेस मध्ये कमी अन् व
वाचनालायात असायचो. दुपारच्या वेळेत लोकसत्ता, Times Of India, इ. पेपर हमखास वाचायचो. मग शिल्लक राहिलेल्या वेळात मेस मध्ये जाऊन हळूच २ चपाती खिश्यामध्ये घालायचो. मेसच्या आमच्या 'तात्यांच्या' तावडीतून सुटून हा पराक्रम करणे म्हणजे वाघच्या जबड्यात हात घालून दात मोजल्यासारखं होतं, आणि समजा कोणी त्यांच्या नजरेत सापडलचं तर ते ओल्या बांबूच्या फटक्यापेक्षा वाईट हाल होत असे. त्यांच्या उच्च प्रतिच्या शब्दांच्या भडीमार होतं असे.
समजलं नाही?
अहो शिव्या ओ शिव्या, अस्सलिखित मराठी गावठी शिव्या. लवंगी मिर्चिच्या ठेच्यापेक्षा तिखट लागत असे. शिव्या खाऊन घेण्याची मनाची तयारी असणारा व्यक्तिच  इथे खंबीरपणे टिकू शकतो नाहीतर त्याची चड्डी ओली झालीच असं समजा. पुन्हा तो वाघच काय मांजरीचे दात सुद्धा मोजायचं पराक्रम करणार नाही.
असो....
रूमवर जाऊन त्या चपातीसोबत चटणी, लोणचे सोबत खाण्याची मजाच काही और होती.
त्यानंतर मात्र परत वर्गात जायला लागायचं...

क्रमशः

Comments

  1. Amey it's very nice and very interesting we'll never ever forget those days....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रवास - ९०% ते ५०% चा

प्रवास - ९०% ते ५०% चा