प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग - ५ ( Shantiniketan Days )

१०वीच्या बोर्डचे पेपर जवळ येत होते. सर्वानी Score करायचं असं मनोमन निश्चय केला होता. शेवटच्या महिन्यात प्रत्येकाचा चेहरा खुप गंभीर झाला होता. प्रत्येकाचा गुणसूत्र जर पडताळून पहिलं असतं तर फक्त त्यात तुम्हाला अभ्यासचेच गुणसूत्र मिळाले असते. आमचा इतका अभ्यास झाला होता की कोणाला कोणत्या पानावर कोणता प्रश्न व उत्तर आहे हे माहित होतं.
इंग्रजी शिकवायला आम्हाला B. T. Shinde सर होते. लहानपणापासून इंग्रजी माध्यमला होतो पण गेल्या ९ वर्षात जेवढं इंग्रजी येत न्हवतं तेवढं १०वीच्या वर्षात शिकलो होतो. Grammer ह्या शब्दाने आमच्या अंगावर काटा यायचा पण Shinde सरांनी आम्हाला इतका छान समजावलं होतं की मी ते आज ही विसरु शकलो नाही. खरं तर इंग्रजी इतकं सोपं जाणे त्यामागे सरांचा खुप मोठा वाटा होताच व तितकीच आमची सहनशीलता. सहनशीलता ह्यासाठी शब्द वापरला कारण थंडीच्या दिवसात भल्या पहाटे ५.३० वाजता जेव्हा अजुन कोंबडा ही आरवलेला नसायचा तेव्हा आमच्या शर्टच्या आत -२० डिग्री सेल्सियस मध्ये ठेवलेला बर्फाचा गोळा व ठंडगार पाणी पाठीवरुन गेल्यावर आमच्याच आरवण्याने कोंबड्याला जाग यायची. याच्या भीतीने रट्टा का मारून होईना पण अभ्यास मात्र होत होता.

आता आली मराठीची बारी. मराठीला आम्हाला विनायक खोत सर व शेवटी कोळेकर सर होते. धड्याखालील उत्तरे कसं लिहावं तर ते कोळेकर सर यांच्या कडून व कवितेला चाल कशी लावावी ते खोत सर यांच्या कडून शिकावं. योग्यरित्या उत्तरांची मांडणी, निबंध कसं असावं, जाहिरात कशी करावी, पत्र कसं लिहावं, अश्या खुप काही गोष्टी ज्या दररोजच्या जीवनात उपयोगी पडतात शिकावं तर खोत सर आणि कोळेकर सरांकडूनच.

'हिंदी' ही भाषा गुलाबजामुन इतकी रसरसीत असते हे मला D. S. Mane सरांकडे शिकल्यावर कळले. मला आज ही धड्याखालील रिकाम्या जागा आठवतात, त्यातून काय बोध सांगितला आहे तो ही आठवतो, कवितेमधील भाव, त्याचे अर्थ सगळा काही स्मरणात आहे. हिंदी भाषा मुळातच इतकी गोड असते माने सरांकडे शिकल्यावर कळाले. त्यांची शिकवण्याची पद्धत  इतकी सोप्पी होती की एखाद्या 'ढ' मुलाला सुद्धा आपलसं करेल.

तिन्ही ह्या दररोज वापरल्या जाणाऱ्या भाषा आहेत. भाषा आपल्याला खुप काही शिकवते. एक-दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी तिचा प्रामुख्याने उपयोग होतो. लोक ह्याने खुप चांगल्या प्रकारे जोडले जाऊ शकतात. भाषा तर आपण गावठी ( गावाकडील, अशुद्ध ) तर बोलतोच प्रमाण भाषा ( शुद्ध भाषा ) येणे ही तितकेच महत्वाचे. माझ्या तिन्ही भाषा व्यवस्थित रुळावर आणण्याचे काम शांतिनिकेतनच्या शिक्षकांनी केले आहे. त्यांना मनापासून खुप खुप धन्यवाद.

क्रमशः

Comments

 1. अप्रतिम अमेय मस्तच

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद रोहित दादा...💞😘😘

   Delete
  2. अरे वाह!!!! छान अमेय दादा...

   Delete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रवास - ९०% ते ५०% चा

प्रवास - ९०% ते ५०% चा