प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग - ४  ( Shantiniketan Days )


सायंकाळी व्यायाम झाल्यावर ७ ते ९ आम्हाला परत अभ्यासासाठी वर्गात जावं लागे. पहिला तास अभ्यास होत होता मात्र त्यानंतर शेवटचा तास मेस मध्ये आज काय जेवायलं असेल याचेच वेध लागलेलं असे. चातक पक्षी ज्याप्रमाणे पाऊसचे वाट बघत असे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा कधी एकदा सुटका होते अन् मेस मध्ये कधी जायला मिळतंय याचीच वाट बघत असे. ९ वाजले रे वाजले आमच्या वर्गाची रांग मेसकडे रवाना व्हायची. आधीच पोटात कावळे ओरडत असत आणि त्यात मेस मध्ये खुप गर्दी असल्याने आम्हाला थोडा वेळ बाहेर थांबवावं लागे. आमच्या आधी ५वी ते ९चे वर्ग सुटलेले असल्या कारणाने आम्हाला नाइलाजास्तव बाहेर थांबण्याशिवाय पर्याय नसे. बाहेर थांबुन आमचं काहीतरी उद्द्योग चाललेलं असे. कोणाला डोक्यात टपली मारणे व हळूच खाली बसणे, कोणाची तर टिंगल करने, समोरच्याला धकलणे व आपण त्या दोघांची भांडणे बघत बसणे हे नित्याचेच झाले होते. कसेबसे जेवण करून होस्टेलवर यायचो व Rectorने शिट्टी मारली की प्रत्येक रूम मधील लाईट बंद व्हायची. आमची प्रत्येक Activity ( क्रियाकलाप ) ही फक्त त्या शिट्टी व वेळेवर ठरलेली असत. दिवसभराच्या थकानामुळे बेडवर पडल्या पडल्या झोप लागे.
सकाळची सुरुवात आमची शिट्टीनेच होत असे. १०मिनिटात आवरून आम्हाला मैदानात यावं लागे. ४००मी.च्या ट्रँकवर ७-८ राउंड मारून व्यायाम करावं लागे. आमच्या मैदानाजवळ एक रेलवे रुळ आहे, सकाळी रेलवे येताना असं वाटे की जणु रेलवेच सूर्याला घेऊन येत आहे. आहह! काय तो सुंदर नजारा. पक्षांचा सुंदर थवा जेव्हा त्या केशरी सूर्यासमोर येत तेव्हा असे वाटे की जणु ते त्याला फळ समजून खात तर नसतील ना? निसर्गाच्या सानिध्यात खुप रमायला व्हायचं. पक्षांची किलबिलाट ही मनाला भावायची.

समजा जर आपण आजच्या भाषेत निसर्गाला 'स्मार्टफोन' म्हणले तर पक्षांची किलबिलाट ही त्याची कायमस्वरुपाची 'रिंगटोन' म्हणले तर वावगं ठरणार नाही. पण आज त्याची अवस्था बघितली तर खुप मनाला लागतं. तुम्हीच बघा ना आता, तुमचं बालपण कसं निसर्गात गेलं व आपण आज कसं जगतो आहे फक्त प्रदूषण, कचरा, आजारपण. आपण आता मोठे झालो आहोत पण आपण जास्त काही मिळवण्याव्यतिरिक्त खुप काही गमवलो आहोत. आपल्या आता लक्षात येणार नाही नंतर येईल पण तोपर्यंत हातातून संधी केव्हाची निघुन गेली असेल. गेल्या २-४ वर्षापासून निसर्ग आपल्याला उन्हाळा, पाऊसाळा, हिवाळाच्या माध्यमातून इशारा देत आहे की हीच सुवर्णसंधी आहे 'निसर्गाला वाचवा' म्हणजे तुम्ही ( माणूस ) वाचाल. प्रत्येकाने एक तरी झाड लावा व त्याची निगा राखा.


वाह्व्या पर्जन्यवृष्टी,
वृक्षांनी सजवा सृष्टी...
धरती मातेचे रुण,
फेडू करून वृक्षारोपण...


क्रमशः

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रवास - ९०% ते ५०% चा

प्रवास - ९०% ते ५०% चा

प्रवास - ९०% ते ५०% चा