प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग - ३ ( Shantiniketan Days )


१०वीच्या परीक्षेला आता फक्त ६ महिने राहिले होते. सर्व विषयांचा अभ्यास पूर्ण झाला होता. आता फक्त परीक्षेची वाट होतो. ह्यावेळी मात्र फक्त अभ्यास न त्यात काहीतरी नवीन ( Creative ) करूया असं मनात आलं व त्यावर प्रयोग चालू केलं. Notes काढायला चालू केलं. आखिव तावावर पूर्ण एका विषयाचा Notes लिहल्या.  अतिशय काटेकोरपद्धतीने Notes काढल्या होत्या. धड्यांतील एक पॉइंट हे फक्त ४-५ मुख्य शब्दात लिहावं यावर माझा मुख्य जोर होता. पाठांतर, नुसता लिहून काढणे किंवा पुस्तकी किडा होण्यापेक्षा मला Linking करून अभ्यास करणे, समजून घेणे यात रस वाटत. माझ्यामते दुपारी फक्त वाचण्यापेक्षा Notes काढणे, लिहणे व स्वतःला झोपण्यापासून परावृत्त करणे उत्तम ठरते. दुपारच्या सत्रानंतर संध्याकाळी ५ला चहापानाची वेळ व्हायची. चहाची सवय नसल्यामुळे फक्त मी biscuit घेऊन बाजूला व्हायचो. त्यानंतर Sportsला जायला बंधनकारक असायचं व तसंही व्यायाम शरीराला चांगला असतोच. माझा आवडता गेम रायफल शूटिंग होतं. यातून मला दोन गोष्टी मिळत गेल्या पहिली म्हणजे मला लहानपणीपासून रायफल शूटिंगबद्दल खुप वेड होते व दूसरी म्हणजे मनाची एकाग्रता खुप वाढते.

आपल्या 'लक्ष्य'वर लक्ष कसं केंद्रित करायचं ह्यातून नक्कीच शिकलो. ज्याचा स्वःवर संयम तोच ह्यात टिकला. प्रेरणा, जिद्द, एकाग्रता, मनाची तयारी व खुप काही शिकण्यासारखं अश्या असंख्य गोष्टी मला शांतिनिकेतन ने दिल्या. प्रत्येकालाच इथे आपल्या कलागुणांना वाव मिळतो. शाळेचे ते दिवसच अनमोल होते. शांतिनिकेतनने आम्हाला खुप काही दिले. त्याची जर यादी काढायाची म्हणल्यावर एक अख्खा Blog कमी पडेल. शांतिनिकेतनवर एक छोटीशी केलेली कविता तुमच्यासमोर सादर करतो -


"अनमोल ते क्षण अन् अप्रूप त्या आठवणी,
'लहानपण देगा देवा' आमुची तुला एकच मागणी...
आयुष्याच्या वळणावर बघताना मागे वळूनी,
शांतिनिकेतनचे दिवस ते साठवलेत आमुच्या मनी..."


क्रमशः

Comments

Popular posts from this blog

प्रवास - ९०% ते ५०% चा

प्रवास - ९०% ते ५०% चा

प्रवास - ९०% ते ५०% चा